Sakshi Sunil Jadhav
आज अनेक संधी येतील. धनयोगासाठी उत्तम असा दिवस आहे. गोड बोलून कामे करून घ्यावीत.
आजवर केलेल्या गोष्टींची चांगली फळ तुम्हाला आज मिळणार आहे. स्वतःतील सकारात्मक गोष्टी शोधून काढून त्याच्यावर कामे कराल.
"देव आला द्यायला झोळी नाही घ्यायला" असा काहीसा दिवस आहे. हातून अनेक चुका होतील. अनेक संधी निसटून जातील. चिडचिड वाढेल. काळजी घ्यावी.
नात्याचा ओलावा आज विशेषत्वाने जाणवेल. आपल्या स्वभावाचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. शेजारी सहकार्य मिळेल.
पद, पैसा, मानसन्मान प्रतिष्ठा याच्यासाठी आपली रास कायमच झगडते. त्यासाठी हात सैल सोडून उदारपणे खर्चही करता, दानही करता.
विष्णू उपासना करा. भाग्याचे दारी खुली होतील. सोपेपणाने दिवस जाईल. पुत्र, पौत्र सुख यासाठी दिवस चांगला आहे.
अचानक धनलाभ संभवतो आहे. जोडीदाराकडूनही पैसे मिळतील किंवा जोडीदाराच्या कुटुंबीयांचा वरदहस्त आपल्यावर राहील.
"प्रेमाने जग जिंकता येतं" हे आज समजेल. नेतृत्वगुणाने बहरलेला दिवस असेल. अनेक कामे एकटेच लिलया कराल.
जुने रोग, आजार आज डोके वर काढतील. उष्णतेचे त्रास संभाळा. नोकरीत मात्र बढतीचे योग आहेत.
शिव उपासना करावी. शेअर्समध्ये फायदा आहे. मोठी गुंतवणूक आज करायला हरकत नाही. आपले वर्चस्व आज अबाधित राहील. दिवस चांगला आहे.
मातृसौख्य चांगले मिळेल. एकमेकांच्या कुटुंबीयातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढे सरसवाल. बौद्धिक कामांमध्ये विशेष यश मिळेल.
पत्रव्यवहार मार्गी लागतील. लेखन क्षेत्रात विशेष प्रगती होईल. आपला पराक्रम सिद्ध कराल. दिवस चांगला आहे.