Saturday Horoscope: अडचणी दूर करण्याची ताकद मिळणार, या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज कार्तिकी एकादशी ठरवलेली काम योग्य पद्धतीने होतील. जुन्या केलेल्या गोष्टीतून मनासारखे लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे.

Mesh | saam tv

वृषभ

काही गोष्टी गुलदस्त्यात असणे चांगले असे वाटेल. तुम्ही तुमचे कर्म कराल मानसिकता इतकी सटल असेल की फळाची अपेक्षा न करता इतर गोष्टीत हिरीरीने भाग घ्याल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

विष्णू उपासना खरोखरी आपल्या राशीला आज सुदिन घेऊन आलेली आहे. भाग्यकारक घटना घडतील.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

मकर

गूढत्वाच्या ओढीने नव्या काही गोष्टी कराल. वाटेत अडचणी आणि काटे आले तरीसुद्धा ते सहजगत्या बाजूला कराल.

मकर | Saam Tv

सिंह

कधी कधी आपल्याला काय वाटते यापेक्षा आपल्या जोडीदाराला काय हवे हे समजून घेणे संसारासाठी गरजेचे आहे. कोर्टाची कामे मनासारखी होतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

आपल्या राशीला पोटाशी निगडित आजार आज संभवत आहेत. आज हे दुखणे कटकटीची ठरेल. संशयग्रस्तता राहील. नोकरीत मात्र दिवस सकारात्मक आहे.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

लक्ष्मीची विशेष कृपा आज तुमच्यावर राहणार आहे. उपासनेसाठी दिवस चांगला आहे.आपल्या मधील शोधकतेला एक वेगळा वाव मिळणार आहे.

Tul Rashi | Saam Tv

वृश्चिक

आयुष्यामध्ये सफल व्हायचं असेल तर कुटुंबीयांचा पाठिंबा सकारात्मक असणे गरजेचे आहे. आज घरी वातावरण चांगला असेल. वाहनाशी निगडित असतील तरीसुद्धा सहज घ्याल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

सारे काही मी करतो असे वाटून घेण्यापेक्षा इतरांच्या सहकार्यामुळे मी पुढे जातो ही भावना जपा. भावंडांचे सौख्य उत्तम आहे. केलेल्या पराक्रमाला योग्य ती पावती मिळेल.

Dhanu Rashi | Yandex

मकर

न बोलता कामे करणे नेटाने पुढे जाणे आपल्या राशीला आवडते. आज धनाशी निगडित काही गोष्टींचे निर्णय तुमच्याकडून लागतील.

मकर | Saam Tv

कुंभ

संशोधनात्मक गोष्टींसाठी विशेष कल राहील यातच तुमच्या राशीला आनंद आहे. नवनवीन गोष्टी आणि संकल्पना यांनी भरलेला आजचा दिवस आहे.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

नको त्या गोष्टींचा मागवा नकोच. काही नातीसुद्धा चुकीची असतात त्यांना खड्यासारखे बाजूला सारणे गरजेचे आहे. आज मानसिक स्वस्थता जपून पुढे जा.

Meen | Saam Tv

NEXT: जेवताना तोंडी लावायला बनवा झणझणीत लसणाचा भुरका

येथे क्लिक करा