Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीर थंड आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी अनेक आरोग्यदायी ड्रिंक प्यायली जातात.
सत्तू हे अत्यंत पौष्टिक मानले जाते. शरीराला त्वरीत ऊर्जा मिळत. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सत्तूचे ड्रिंक प्यायल्यास संपूर्ण दिवसभर शरीर ताजेतवाने राहते.
सत्तूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबर जास्त असते यामुळे वजन कमी करण्यासाठी सत्तू ड्रिंकचे सेवन केले जाते.
ज्यांना डायबिटीज असेल अश्यांनी सत्तू ड्रिंकचे सेवन केल्यास फायदा होईल.
सत्तू ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला चणे किंवा चण्याची डाळ हे साहित्य घ्यायचे आहे.
गॅसवर एका कढईमध्ये चणे किंवा चण्याची डाळ सोलून खरपूर भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरच्या भाड्यांमध्ये चणे घाला आणि त्याचे बारीक पीठ तयार करा.
एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या त्यात हे २ ते ३ चमचे सत्तू मिक्स करून चण्याचे पीठ आणि साखर मिक्स करा.
या रसात तुम्ही लिंबाचा रस आणि हिरवी मिरची देखील बारीक कापून मिक्स करू शकता.