Manasvi Choudhary
सॅटिन साडयांचा ट्रेंड कायमच असतो. प्रत्येक महिलेकडे एकतरी सॅटिन साडी असते.
मऊ आणि शायनिंग फॅब्रिकमुळे सॅटिन साडी नेसल्यावर सुंदर दिसते. सॅटिन साडींचे अनेक डिझाईन्स आहेत.
दोन रंगांचे सुंदर मिश्रण असलेली ही साडी सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे. डार्क लाईट अशा शेडमध्ये ही साडी असते.
संपूर्ण साडीवर बारीक उभ्या प्लेट्स असतात युनिक पॅटर्नमध्ये साडी तुम्ही नेसू शकता. अत्यंत स्टायलिश लूक दिसतो.
साध्या सॅटिन साडीला रॉयल लूक देण्यासाठी बॉर्डर असते. साडी प्लेन असली तर बॉर्डरमुळे छान दिसते. लग्न किंवा संगीत साठी तुम्ही ही साडी निवडू शकता.
जर तुम्हाला प्लेन साडी नको असेल, तर डिजिटल फ्लोरल प्रिंट सॅटिन साडी निवडा. संगीत, गेट- टुगेदरसाठी या साडी बेस्ट आहेत.
प्लेन सॅटिन साडीवर त्याच कापडाचा किंवा नक्षीदार मेटॅलिक बेल्ट वापरला जातो. जो स्लिम फिट साडी प्रकार आहे.