Maharashtra Tourism : सात टेकड्यांच्या कुशीतलं महाराष्ट्रातील निसर्गरम्य शहर, उन्हाळ्यात भरते काश्मीरसारखी हुडहुडी

Shreya Maskar

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले सातारा येथे उन्हाळ्यात थंड वातावरण अनुभवता येते. इतिहास आणि निसर्गाचा संगम येथे पाहायला मिळतो. अनेक सुंदर पिकनिक स्पॉट्स येथे आहेत.

Maharashtra | pinterest

कास पठार

कास पठाराला 'फुलांची दरी' असेही म्हणतात. कास पठार हे युनेस्कोचे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ आहे. पावसाळ्यानंतर (ऑगस्ट-सप्टेंबर) येथे फुलणाऱ्या ८५० हून अधिक प्रकारच्या रानफुलांसाठी कास पठार ओळखले जाते.

Kaas Plateau | pinterest

ठोसेघर धबधबा

हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात ठोसेघर धबधबा वसलेला आहे. डोंगरावर धुक्याची चादर पाहायला मिळते. या धबधबा ५०० मीटर (सुमारे १६०० फूट) उंचीचा आहे.

Thoseghar Waterfalls | pinterest

अजिंक्यतारा किल्ला

साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ला हे एक ऐतिहासिक ठिकाणही आहे. किल्ल्यावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. येथे तुम्ही ट्रेकिंगचा भन्नाट आनंद घेऊ शकता.

Ajinkyatara Fort | google

सज्जनगड किल्ला

सज्जनगड किल्ला साताऱ्यात वसलेला आहे. याला पूर्वी 'परळीचा किल्ला' म्हणून ओळखले जात असे. हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. सभोवताली सुंदर हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो.

Sajjangad Fort | google

कोयना धरण

कोयना धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधलेले आहे. हिरव्यागार जंगलांनी वेढलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. जे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे.

Koyna Dam | google

शिवसागर तलाव

कास पठाराजवळ शिवसागर तलाव आहे. येथे बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्सची सोय आहे. जोडीदारासोबत येथे नक्की फिरायला जा.

Shivsagar Lake | google

टीप

वरील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

satara | google

NEXT : 'राजा शिवाजी'चे शूटिंग झालेल्या 'वाई'मधील ५ ऐतिहासिक ठिकाणे, आताच प्लान करा उन्हाळी सहल

Wai Tourism | saam tv
येथे क्लिक करा...