Shreya Maskar
प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात पश्चिम घाटातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाजवळ आहे.
प्रतापगड किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशानुसार १६५६ मध्ये करण्यात आली. या बांधकामावर पेशवे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांचे पर्यवेक्षण होते आणि स्थानिक पातळीवर याचे व्यवस्थापन सरदार हिरोजी इंदुलकर यांनी केले होते.
प्रतापगड किल्ला समुद्रसपाटीपासून १,०८० मीटर उंचीवर स्थित आहे. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.
प्रतापगड किल्ला उंचावरील 'बालेकिल्ला' आणि आग्नेय उतारावर १२ मीटर उंच बुरुजांनी सुरक्षित केलेला 'खालचा किल्ला' अशा दोन भागांत विभागलेला आहे.
अरुंद डोंगररांगेवर उंचावर असूनही, या किल्ल्याच्या परिसरात चार कायमस्वरूपी जलाशय आणि तलाव आहेत, जे पावसाळ्यात पाण्याने भरून जातात.
प्रतापगड किल्ल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे भव्य मंदिर १६५६ मध्ये बांधले. या मंदिरात देवीची मूर्ती अष्टभुजा (आठ हातांची) आहे.
प्रतापगड किल्ला, 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या ऐतिहासिक लढाईसाठी प्रसिद्ध आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा सेनापती अफझलखानचा पराभव केला.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.