ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका अशा जिल्ह्याबद्द्ल सांगणार आहेत. जेथे सौदर्यांने नटलेली सुंदर ठिकाण आहेत. या ठिकाणांना एकदा तरी नक्की भेट द्या.
कास पठार हे महाराष्ट्र जिल्ह्यातील नैसर्गिक सौदर्यांने भरलेले ठिकाण आहे. कास पठाराला फुलांचा पठार देखील म्हणतात. शहरापासून हे ठिकाण २४ किलोमीटर अंतरावर आहे. येथे ८५० पेक्षा जास्त प्रजातीची फुले आढळतात.
ठोसेघर धबधबा साताऱ्यापासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याची दृध्ये अतिशय मनमोहक आहेत. हा धबधबा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो.
भांबवली वजराई धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. जर तुम्ही ट्रेकिंगप्रेमी आहात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
अजिंक्यतारा किल्ला साताऱ्यापासून ४ किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सातारगड, सप्तर्षीगड, सातारचा किल्ला, आझमतारा, अजिंक्यतारा या नावाने देखील ओळखला जातो.
साताऱ्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात भगवान शिवचे प्राचीन मंदिर आहे. हे साताऱ्या जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्र आहे.
मायणी पक्षी अभयारण्य हे पक्षीप्रेमींसाठी फिरण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथे ४००हून अधिक जातीचे पक्षी आहेत.
साताऱ्याजवळील कृत्रिम शिवसागर सरोवराला नक्की भेट द्या. निसर्गप्रेमी आणि पर्यटाकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र आहे.