ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पितृपक्षाची अंतिम अमावस्या म्हणजे सर्वपित्रे अमावस्या. या दिवशी पितरांना मोक्ष मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करणे पितृदोष निवारणासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
आश्विन अमावस्या ही सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. तारीख नसेल तरी या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करणे पितृदोष निवारणासाठी फायदेशीर ठरते.
पितृदोषामुळे आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या, वैवाहिक तणाव आणि मुलांशी संबंधित अडचणी निर्माण होतात. सर्वपित्री अमावस्येला उपाय करून यावर नियंत्रण मिळवता येते.
सर्वपित्री अमावस्येला पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध करा. पाणी, तीळ आणि कुश वापरून तर्पण केल्यास पितरांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो.
सर्वपित्री अमावस्येला पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा करा आणि त्यावर तीळ, पाणी, फुले अर्पण करा. यामुळे पितृदोष निवारण होतो आणि पितरांना शांती मिळते.
काळे तीळ, काळा कापड, लोखंड, तेल दान करा आणि ब्राह्मणांना अन्नदान करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृदोष निवारण होतो.
'ॐ त्र्यंबकम यजामहे सुगंधि पुष्टीवर्धनम्... उर्वारुकमिव बंधनं मृत्योर्मुक्षीय मामृतात्' महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने पितृदोष आणि शनीचा प्रभाव कमी होतो.
सर्वपित्री अमावस्येला गंगा किंवा पवित्र नदीत स्नान केल्यास पितृदोष दूर होतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते, जीवनात शांती आणि समृद्धी येते.