Pitru Paksha 2025: पितृपक्ष काळात स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे मानले जाते शुभ, जाणून घ्या त्यांचे महत्त्व

Dhanshri Shintre

पितृपक्षात पडलेली स्वप्न

पितृपक्ष काळात आलेली स्वप्ने विशेष मानली जातात. चला जाणून घेऊया ती ७ शुभ स्वप्ने जी पूर्वजांचे आशीर्वाद आणि घरातील समृद्धीचे प्रतीक असतात.

पूर्वज आनंदी दिसणे

स्वप्नात पूर्वज आनंदी दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमच्या श्रद्धा-पूजेमुळे ते प्रसन्न असून तुम्हाला आशीर्वाद व समृद्धी प्रदान करत आहेत.

पैसे मिळणे

स्वप्नात मृत पूर्वजांकडून पैसे मिळणे अत्यंत शुभ मानले जाते. हे आर्थिक वाढ, समृद्धी आणि पूर्वजांच्या शुभेच्छांचा संकेत देणारे लक्षण मानले जाते.

पलंगाजवळ उभे असलेले पूर्वज

स्वप्नात पलंगाजवळ उभे असलेले पूर्वज दिसणे हे त्यांचे संरक्षण, मार्गदर्शन आणि कुटुंबातील शांतता व सौख्याचे प्रतीक मानले जाते.

आशीर्वाद

स्वप्नात पूर्वज आशीर्वाद देताना दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ जीवनात यश, आनंद आणि पूर्वजांच्या कृपेचा लाभ मिळणार आहे.

वडीलांना हसताना पाहणे

स्वप्नात मृत वडील हसताना दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ त्यांचे समाधान, तसेच कुटुंबात आनंद आणि प्रगतीचे संकेत असतात.

हात पुढे करणे

स्वप्नात पूर्वजांनी हात पुढे करणे हे त्यांच्या सहाय्य व पाठिंब्याचे चिन्ह आहे. हे अडचणींवर विजय मिळवण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश देते.

जेवताना दिसणे

स्वप्नात पूर्वज जेवताना दिसणे हे त्यांनी श्राद्ध-तर्पण स्वीकारल्याचे सूचक आहे. यामुळे ते प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद आणि समृद्धी प्रदान करतात.

महत्त्व काय

गरुड पुराणात म्हटले आहे की पितृपक्षातील स्वप्ने ही पूर्वजांची संदेशवाहक असतात. शुभ स्वप्ने पितृदोष निवारण, आशीर्वाद आणि जीवनातील प्रगतीचे संकेत देतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

येथे क्लिक करा