Manasvi Choudhary
रविवार २२ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व पितृ अमावस्या आहे.
सर्व पितृ अमावस्येला पितरांची श्राद्ध, पिंडदान या विधी केल्या जातात. श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात.
पितृपक्षाच्या काळात दान धर्माला विशेष महत्व आहे. यानुसार राशीनुसार कोणत्या गोष्टी दान कराव्यात जाणून घ्या.
सर्व पितृ अमावस्येला मेष राशीच्या लोकांनी लाल कपडे आणि फळे दान करावीत.
ज्या लोकांची रास वृषभ आहे त्यांनी तांदूळ, साखर आणि पीठ दान करा.
मिथुन राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मूग आणि हिरव्या भाज्या दान करा.
कर्क राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येला दूध, दही, पोहे आणि साखर या वस्तूचे दान करा.
सिंह राशीच्या लोकांना सर्व पितृ अमावस्येला गहू आणि लाल रंगाचे वस्त्र दान करावे.
कन्या राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे दान करावीत.
तूळ राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तांदूळ, डाळी, पांढरे तीळ आणि बार्ली दान करावे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येला मध, गूळ आणि लाल रंगाची फळे दान करावीत.
धनु राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मका, केळी, पपई, ऊस दान करावे.
मकर राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गरजूंना खिचडी वाटावी.
कुंभ राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चामड्याचे बूट, चप्पल आणि ब्लँकेट दान करावे.
मीन राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिवळे कपडे आणि बेसन दान करावे.