Manasvi Choudhary
सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. वर- वधूसाठी विविध पारंपारिक दागिन्यांची मागणी वाढली आहे.
वधूसाठी पारंपारिक श्रृंगारामध्ये कमरपट्टा, छल्ला हा प्रकार प्रसिद्ध आहे. आजही अनेक वधू म्हणजेच मुली ही स्टाईल करतात. साडीवर कंबरपट्टी, छल्ला उठून दिसतो.
साडीवर घालण्यासाठी तुम्ही काही युनिक आणि ट्रेडिंग डिझाइन निवडू शकता. ज्या शोभून दिसतील.
अत्यंत नाजूक अश्या डिझाइनचा कमरपट्टा तुम्ही घेऊ शकता.
नाण्यांसारखी डिझाइन असलेला हा कंबरपट्टा तुम्ही निवडू शकता.
कुंदन, रंगीत मोती किंवा हिरे असलेले हेव्ही कमरपट्टा तुम्ही डिझाइनर साडीवर वेअर करू शकता.
चांदीचा कंबरपट्टा पारंपारिक साजश्रृंगार आहे. यामध्ये नाजूक नक्षीकाम केलेले असते.
अनेक पातळ पदरांनी बनलेली कंबर साखळी, जी कंबरेभोवती सैल सोडलेली असते, सध्या ट्रेंडमध्ये आहे. यात पेंडेंट किंवा रंगीत मणी लावलेले असतात.
काही कंबर साखळ्यांच्या बाजूला किंवा मध्यभागी आकर्षक लटकन (टॅसेल्स) असतात, जे तुमच्या कमरेला एक विशिष्ट आकार देतात आणि आकर्षक वाटतात.