Manasvi Choudhary
'हम आपके है कौन' फेम अभिनेत्री रेणुका शहा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते.
रेणुका शहाने अनेक चित्रपट, टिव्ही मालिका आणि वेबसीरिजमध्ये अभिनय केला आहे.
नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत रेणुकाने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाविषयी धक्कादायक सांगितले आहे.
सुरूवातीच्या काळात अभिनेत्रीसोबत एका दिग्दर्शकाने गैरवर्तन केल्याचा प्रसंग तिने सांगितला आहे.
एक निर्माता माझ्या घरी आला, त्याने माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला, त्याने मला सांगितले की, तो विवाहित आहे.
पुढे तो म्हणाला, तुम्ही माझ्या साडी कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर व्हा, पुढे त्याने तू माझ्याबरोबर राहा, मी दर महिन्याला तुला पैसे देईन असा देखील म्हणाला.
हे ऐकल्यानंतर मी आणि माझी आई खूप घाबरलो होतो. रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या की, त्याने दिलेली ऑफर आणि पैसे मी नाकारले.