Manasvi Choudhary
साडी नेसल्यावर हेअरस्टाईल केल्याने तुमचे सौंदर्य उठून दिसत नाही तर तुमचा पूर्ण लूक परफेक्ट दिसतो.
ट्रेडिशल साडी लूकवर तुम्ही केसांची हटके स्टाईल करू शकता केसांच्या हेअरस्टाईलचे अनेक पॅटर्न आहेत.
लो मेसी बन ही हेअरस्टाईल ट्रेंडमध्ये आहे. केसांच्या खालच्या बाजूला सैल अंबाडा बांधा.
काठपदर साडी किंवा पैठणी साडी नेसल्यावर तुम्ही पारंपारिक वेणी आणि गजरा असा लूक करू शकता.
जर तुम्हाला मॉडर्न आणि इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल, तर तुम्ही स्लीक पोनीटेल हेअरस्टाईल करू शकता.
पुढचे काही केस घेऊन मागे 'पफ' किंवा 'ट्विस्ट' करून पिन करा आणि बाकीचे केस मोकळे सोडून त्यांना 'सॉफ्ट कर्ल्स' करा.
सर्व केस एका बाजूला घेऊन खांद्यावर सोडा. केसांना हलके वेव्हज द्या.