Saree Draping Styles: कॉलेजपासून पार्टीपर्यंत दिसा स्टायलिश! या ७ साडी ड्रेपिंग स्टाइल्स करतील तुमचा लूक खास

Shruti Vilas Kadam

पँट स्टाइल साडी ड्रेपिंग

पारंपरिक पेटीकोटऐवजी साडीसोबत ट्राउझर्स किंवा फिटेड पँट घाला. क्रॉप टॉप किंवा ब्लेझरसोबत ही स्टाइल केल्यास मॉडर्न आणि बोल्ड लूक मिळतो.

Saree Draping Styles

धोती स्टाइल साडी

धोतीप्रमाणे घड्या घालून नेसलेली साडी आरामदायी आणि ट्रेंडी दिसते. कॉलेज फेस्ट, संगीत किंवा फॅशन इव्हेंटसाठी हा लूक खास ठरू शकतो.

Saree Draping Styles

बेल्ट स्टाइल साडी

साडीच्या कमरेवर स्टायलिश बेल्ट लावल्याने लूकला मॉडर्न फिनिश मिळतो. मेटॅलिक, एम्ब्रॉयडरी किंवा मिनिमल बेल्ट निवडून साडीला वेगळा टच देता येतो.

Saree Draping Styles

बटरफ्लाय स्टाइल साडी

पातळ आणि आकर्षक पदराची ड्रेपिंग या स्टाइलचे वैशिष्ट्य आहे. शिफॉन किंवा जॉर्जेट साडीवर ही पद्धत छान दिसते. पार्टीसाठी सीक्विन ब्लाउजसोबत ट्राय करा.

Saree Draping Styles

केप स्टाइल साडी

साडीवर केप ब्लाउज किंवा शॉर्ट केप घातल्यास आकर्षक इंडो-वेस्टर्न लूक तयार होतो. रिसेप्शन, एंगेजमेंट किंवा सणासुदीच्या कार्यक्रमासाठी हा पर्याय उत्तम आहे.

Saree Draping Styles

वन-शोल्डर ड्रेपिंग

साडीचा पदर एका खांद्यावर वेगळ्या पद्धतीने सेट करून मॉडर्न लूक मिळवता येतो. स्लीव्हलेस किंवा वन-शोल्डर ब्लाउजसोबत ही स्टाइल अधिक उठून दिसते.

Saree Draping Styles

रफल स्टाइल साडी

रफल्स असलेली साडी किंवा पदराला रफल डिझाइन दिलेली साडी लूकमध्ये आकर्षकपणा आणते. हलक्या रंगांमध्ये किंवा पेस्टल शेड्समध्ये ही स्टाइल फोटोशूट आणि पार्टीसाठी छान दिसते.

Saree Draping Styles

Skin Care: इंस्टंट ग्लो आणि मुलायम त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा हा घरगुती टोनर; चेहरा दिसेल चमकदार

Skin Care
येथे क्लिक करा