Saree Draping Style: लग्नसराईत सहावारी साडीला द्या हटके लूक; पाहा या साडी नेसण्याच्या ७ स्टायलिश पद्धती

Shruti Vilas Kadam

पारंपरिक नवी स्टाईल

महाराष्ट्रातील पारंपरिक नवी पद्धतीने साडी नेसल्यास साधेपणातही आकर्षक लूक मिळतो. ही स्टाईल सण आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम मानली जाते.

Saree Draping Style

गुजराती पल्लू स्टाईल

या पद्धतीत साडीचा पल्लू पुढच्या बाजूला घेतला जातो. भरतकाम किंवा जड डिझाईन असलेल्या साड्यांसाठी ही स्टाईल खूप सुंदर दिसते.

Saree Draping Style

बेल्ट साडी स्टाईल

साडीवर स्टायलिश बेल्ट वापरण्याचा ट्रेंड सध्या खूप लोकप्रिय आहे. यामुळे मॉडर्न आणि एलिगंट लूक मिळतो तसेच साडी व्यवस्थित राहते.

Saree Draping Style

मरमेड ड्रेपिंग स्टाईल

मरमेड स्टाईलमध्ये साडी शरीराला फिट बसवली जाते. पार्टी किंवा रिसेप्शनसाठी ही स्टाईल ग्लॅमरस लूक देणारी ठरते.

Saree Draping Style

पँट स्टाईल साडी

पेटीकोटऐवजी पँट किंवा लेगिंग्सवर साडी नेसण्याची ही मॉडर्न स्टाईल तरुणींमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे फ्युजन आणि कम्फर्टेबल लूक मिळतो.

Saree Draping Style

लेहेंगा स्टाईल ड्रेपिंग

साडीला घेरदार लेहेंग्यासारखा लूक देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. लग्न किंवा खास कार्यक्रमांसाठी ही स्टाईल खूप आकर्षक दिसते.

Dupatta Draping Styles

ओपन पल्लू स्टाईल

ओपन पल्लूमुळे साडी अधिक ग्रेसफुल दिसते. हलक्या फॅब्रिकच्या साड्यांवर ही स्टाईल खूप उठून दिसते आणि फोटोशूटसाठीही परफेक्ट मानली जाते.

Saree Draping Style | Saam Tv

Kurta Back Design: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्रेंडी बॅकलेस कुर्तीच्या या ७ स्टायलिश डिझाइन्स नक्की पहा

Kurta Back Design
येथे क्लिक करा