Manasvi Choudhary
हिवाळ्यात तापमानात बदल झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. हिवाळ्यात इन्फ्लूएन्झा आणि सर्दी ही समस्या अनेकांना भेडसावते. अशावेळी काय उपाय करावे हे जाणून घ्या.
एक कप गरम चहा किंवा गरम पाण्यात लिंबू मध मिसळून प्यायल्याने खोकला आणि घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
घसा खवखवणे किंवा संसर्गामुळे नाक बंद पडण्याची समस्या कमी करण्यासाठी वाफ घेणे फायदेशीर ठरू शकते. गरम पाण्याची वाफ तुमच्या घशातील कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकते.
कोरड्या खोकल्यावर आलं हे नेहमी उपयुक्त समजले जाते. ही एक औषधी वनस्पती असून या आजारावर रामबाण उपाय आहे. आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील लसूण हा आणखी एक पर्याय आहे. लसणाची एक पाकळी चघळल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.