Shruti Kadam
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही नवीन आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सारा पारंपरिक वेशभूषेत दिसत असून तिचा अॅथनिक लूक चाहत्यांना भुरळ घालणारा आहे.
साराच्या चेहऱ्यावरचं सहज हास्य आणि आत्मविश्वास तिच्या फोटोना अधिक उठावदार बनवत आहेत.
तिच्या सिंपल पण एलिगंट स्टाईलमुळे सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्सचं भरपूर कौतुक होत आहे.
तिच्या पोस्टवर चाहत्यांनी "गॉर्जियस", "स्टनिंग", "अप्सरा" अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
साराकडे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असून तिच्या प्रत्येक पोस्टला मोठा प्रतिसाद मिळतो.
तिच्या ग्लॅमरस लूकनंतर पुन्हा एकदा तिला बॉलिवूडमध्ये पाहण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.