Maratha History: छत्रपती शिवरायांच्या या मावळ्याला खुद्द औरंगजेबही घाबरायचा, थेट मोगल छावणीवर टाकलेली धाड

Surabhi Jayashree Jagdish

मराठा इतिहास

मराठा साम्राज्याच्या इतिहासात संताजी घोरपडे यांचे नाव अत्यंत धाडसी आणि पराक्रमी योद्धा म्हणून घेतलं जातं. औरंगजेब यालाही त्यांच्या चपळ हल्ल्यांची भीती वाटत असे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठा स्वराज्यावर संकट आलं असताना संताजींनी मोगलांवर जबरदस्त आक्रमणं केली.

Maratha history

संताजींची युद्धनीती

संताजी घोरपडे हे गनिमी काव्यात पारंगत होते. ते अचानक हल्ले करून शत्रूला गाफील ठेवत असत. यामुळे मोगल सैन्य कायमच संभ्रमात राहत असे.

Maratha empire

मोगलांविरुद्ध आक्रमक

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य संकटात आलं. या काळात संताजींनी लढ्याची धुरा सांभाळली. त्यांनी मोगलांविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारलं.

Guerrilla warfare

औरंगजेबावर दबाव

औरंगजेब स्वतः दक्षिणेत मोहिमा करत होता. संताजींच्या हल्ल्यांमुळे त्याची झोप उडाली होती. तो सतत सावध राहण्यास भाग पाडला गेला.

Aurangzeb

मोगल छावणीवरील हल्ला

संताजींनी मोगल छावणीवर अचानक धाड टाकली. त्यांनी छावणीतील कळस कापून आणल्याची नोंद अनेक इतिहासकारांनी केली आहे. हा प्रकार मोगलांसाठी मोठा अपमान मानला गेला.

Sambhaji Maharaj

काफीखानचा उल्लेख

औरंगजेबाच्या छावणीत असलेला इतिहासकार काफीखान यांनी संताजींच्या पराक्रमाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठ्यांच्या हल्ल्यांचं वर्णन केलंय. मोगल सैन्याची झालेली दैना त्यांनी नमूद केली.

Mughal empire

मराठ्यांचा इतिहासातील संदर्भ

मराठ्यांचा इतिहास खंड १ मध्ये संताजींच्या मोहिमांचा तपशील आहे. त्यांच्या धाडसी स्वाऱ्या आणि लढायांचं वर्णन केलंय. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं सांगितलंय

Brave warrior

गनिमी काव्याचा प्रभाव

संताजींच्या गनिमी हल्ल्यांमुळे मोगल त्रस्त झाले. ते लहान तुकड्यांमध्ये हल्ले करून मोठे नुकसान करत. हीच पद्धत पुढे मराठ्यांची ताकद बनली.

Mughal army

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

Shivaji Maharaj history
येथे क्लिक करा