ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदूधर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते.
अनेकलोकांचा संकष्टी चतुर्थी निमित्त उपवास असतो. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास तुमच्या कामामध्ये प्रगती होते.
गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता मानलं जातं. बाप्पाची पूजा केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील विध्न दूर होण्यास मदत होते.
पंचांगानुसार, ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थी २२ऑगस्टला १ वाजून ४६ मिनिटांपासून २३ऑगस्ट १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करुन गणपतीची मुर्ती देवघरात स्थानपन्न करा. त्यानंतर गणपतीच्या मुर्तीचं अभिषेक करून त्यासला फूलांचा आणि दुर्वांचा हार अर्पण करा.
पूजा करताना देवघरासमोर धुप लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी संपन्न होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.