Shreya Maskar
सह्याद्री पर्वतरांगेतील सांधण व्हॅली ही महाराष्ट्राची 'ग्रँड कॅन्यन' म्हणून ओळखली जाते. ही २०० फूट खोल आणि १.५ किमी लांब अशी दरी आहे, जी पाण्यामुळे नैसर्गिकरीत्या तयार झाली आहे.
सांधण व्हॅली येथील अरुंद दरीमुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच याला 'व्हॅली ऑफ शॅडोज' (सावल्यांची दरी) असेही म्हणतात.
सांधण व्हॅलीला जाण्यासाठी ५-६ तासांची रोमांचक ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. ज्यामध्ये मोठ्या खडकांवरून उड्या मारत पुढे जाणे , उथळ पाण्यातून चालणे आणि ८०-१०० फूट उंचीवरून 'रॅपलिंग' (दोरीच्या साहाय्याने खाली उतरणे) करणे यांचा समावेश असतो.
सांधण व्हॅली अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील सम्राद गावाजवळ स्थित आहे. संधान व्हॅली भंडारदराजवळील सुंदर ठिकाण आहे.
दरी रोमांचक ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, विशाल खडकांवरून रॅपलिंग करणे आणि अत्यंत गडद व ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे.
पावसाळ्यात सांधण व्हॅलीचे रूपांतर पश्चिम घाटातील नंदनवनात होते. अरुंद खडकाळ दऱ्यांमधून धबधबे कोसळतात, वाटेवर उथळ ओढे तयार होतात आणि आजूबाजूचा भंडारदरा प्रदेश हिरवळीने बहरलेला असतो.
सांधण व्हॅलीजवळ उलटा धबधबा, भंडारदरा धबधबा ही ठिकाणे आहेत. येथे धुक्याची चादर पाहायला मिळते. पावसाळ्यात दरीत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे खाली कोसळणारे प्रवाह पाणी वरच्या दिशेने उडवते, ज्यामुळे एक मनमोहक उलट्या धबधब्याचा प्रभाव निर्माण होतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.