Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Shreya Maskar

पालघर

चिंचोटी धबधबा हा पालघर जिल्ह्यातील वसई आणि नायगावजवळ असलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात वसलेला आहे.

Palghar | google

चिंचोटी धबधबा

१०० फूट उंच असलेल्या या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी चिंचोटी या पायथ्याच्या गावापासून दीड ते दोन तासांचा जंगल ट्रेक करावा लागतो.

Chinchoti Falls | google

कसं जाल?

चिंचोटी धबधब्याला जाण्यासाठी नायगाव स्टेशनला उतरा तेथून पुढे चिंचोटी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करा.

how do you go | google

वन डे पिकनिक स्पॉट

मुंबईकर आणि वसई-विरार परिसरातील स्थानिक लोकांसाठी वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे.

One day picnic spot | pinterest

निसर्ग सौंदर्य

चिंचोटी धबधबा तुंगारेश्वर डोंगररांगांनी वेढलेला असून येथे सुंदर, हिरवेगार वातावरण अनुभवता येते. तसेच येथे तुम्ही फोटोशूटचा देखील भन्नाट आनंद घेऊ शकता.

Beauty of nature | pinterest

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य हे मुंबईजवळील ८५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील एक समृद्ध जैवविविधता केंद्र आहे. येथे भगवान शिवाला समर्पित असलेल्या प्राचीन तुंगारेश्वर मंदिर देखील आहे.

Tungareshwar Wildlife Sanctuary | pinterest

पावसाळा

रिमझिम पावसात येथे तुम्हाला धुक्याची चादर पाहायला मिळते. तसेच इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा पाहून तुम्ही वेडे व्हाल.

rainy season | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात एकदा तरी पाहाच आंबोलीतील 'हे' ठिकाण, जिथे धबधब्याचे पाणी खाली नव्हे तर वर उडते

Amboli WaterFalls | AI PHOTO
येथे क्लिक करा...