Amboli WaterFalls : पावसाळ्यात एकदा तरी पाहाच आंबोलीतील 'हे' ठिकाण, जिथे धबधब्याचे पाणी खाली नव्हे तर वर उडते

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

कावळेसाद धबधबा 'कावळशेत पॉईंट' म्हणूनही ओळखले जाते. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटातील धुक्याने वेढलेल्या टेकड्यांमध्ये वसलेला आहे.

Sindhudurg | google

कावळेसाद धबधबा

कावळेसाद धबधबा पावसाळ्यात उलटा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. दरीतून वाहणारे जोरदार वारे गुरुत्वाकर्षणाला छेद देत पडणाऱ्या पाण्याला वरच्या दिशेने ढकलतात, ज्यामुळे एक विस्मयकारक दृश्य पाहायला मिळते.

Kavalesaad Waterfall | google

पावसाळ्याचे सौंदर्य

पावसाळ्यात येथे धुक्याने आच्छादलेली खोल दरी दिसते, जिथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे सुंदर वातावरण अनुभवता येते.

Monsoon Beauty | google

फॅमिली ट्रिप

बेळगाव मार्गावरील मुख्य आंबोली धबधब्यापासून सुमारे १० किमी अंतरावर कावळेसाद हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे फॅमिली ट्रिप प्लान करा.

Family Trip | google

आंबोली हिल स्टेशन

आंबोली हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. येथे होणाऱ्या प्रचंड पर्जन्यमानामुळे याला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हणून ओळखले जाते.

Amboli Hill Station | google

निसर्ग सौंदर्य

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ६९० मीटर उंचीवर आंबोली हिल स्टेशन वसलेले आहे. कोकणच्या मैदानी प्रदेशातून गोव्याकडे जाताना लागणारे हे थंड हवेचे ठिकाण आहे.

Natural Beauty | google

नांगरतास धबधबा

कावळेसाद धबधब्याजवळ नांगरतास धबधबा आहे. येथे तुम्हाला उंचावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शु्भ्र धबधब्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.

Nangartas Waterfall | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

Khopoli Hill Station | AI PHOTO
येथे क्लिक करा...