Shreya Maskar
डाळीचे सांडगे बनवण्यासाठी मटकी डाळ, चणा डाळ, मूग डाळ, लसूण, जिरे, मीठ, लाल तिखट, हळद, हिंग इत्यादी साहित्य लागते.
डाळीचे सांडगे बनवण्यासाठी सर्वप्रथम मटकी ,चणा, मूग डाळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी मिक्सरला लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि सर्व डाळी लावून त्यांची पेस्ट करून घ्या.
हे मिश्रण बाऊलमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, आणि हिंग घालून एकत्र करा.
आता एका ताटात प्लास्टिक पेपर घालून त्याला तेल लावा.
प्लास्टिक पेपरवर छोटे – छोटे सांडगे पाडून घ्या.
सांडगे वाळवण्यासाठी ताट उन्हामध्ये आणि पंख्याखाली ४-५ पास दिवस ठेवा.
सांडगे चांगले कोरडे झाले की खाण्याच्या वेळी तेलात खरपूस तळा.