Shruti Vilas Kadam
ताजं पनीर (छेना), साखर, वेलची पावडर आणि थोडे ड्रायफ्रूट्स हे संदेश बनवण्यासाठी मुख्य साहित्य आहे.
पनीर नीट मळून घ्या, जेणेकरून त्यात गाठी राहणार नाहीत आणि टेक्स्चर मऊ व स्मूद होईल.
मळलेल्या पनीरमध्ये साखर घालून पुन्हा चांगलं मिक्स करा, जेणेकरून गोडपणा समान पसरतो.
हे मिश्रण मंद आचेवर 5-7 मिनिटे हलवत शिजवा. जास्त शिजवू नका, नाहीतर पनीर कडक होईल.
शेवटी वेलची पावडर घालून छान सुगंध आणा. इच्छेनुसार केशर किंवा गुलाबजलही घालू शकता.
थंड झाल्यानंतर हाताने किंवा साच्याने लहान-लहान संदेशचे आकार द्या.
वरून बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.