ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चंदन ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. चंदनाचा सुंगध खूपच सुंदर असतो.
चंदनाचा वापर अगरबत्ती बनवण्यापासून ते अगदी जखमे बरी करण्यापर्यंत सर्व ठिकाणी केला जातो.
निरोगी त्वचेसाठी चंद हे खूप लाभदायी असते. चंदनाचे तेल लावल्याने चेहरा खूप सुंदर दिसतो.
चंदनामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. टॅनिंगपासून आराम मिळतो.
चंदन हे थंड असते. त्यामुळे मुरुम, पिंपल्स घालवण्यासाठी चंदनाचे तेल वापरा.
उन्हाळ्यात चेहरा खूप जास्त टॅन होतो. चंदनाचा लेप किंवा तेल लावल्याने चेहरा जास्त टॅन होणार नाही.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.