Siddhi Hande
समृद्धी महामार्ग ५ जून रोजी सुरु होणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.
समृद्धी महामार्ग ७०१ किलोमीटरचा आहे. या महामार्गामुळे अनेक ठिकाणे जोडली जाणार आहेत.
समृद्धी महामार्गा १२० मीटर रुंदीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग आहे.
१० जिल्हे, २६ तालुके अन् ३९२ गावांना जोडणारा हा महामार्ग आहे.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर ८ तासात कापता येणार आहे.
समृद्धीच्या आजूबाजूला ११ लाख ३१ हजार वृक्षांची लागवड होणार आहे.
समृद्धी महामार्गालगत १९ कृषी समृद्धी केंद्रे उभारली जाणार आहे.
या महामार्गात ६५ उड्डाणपूल, ३३ मोठे पूल, २७४ छोटे पूल, ८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, २५ इंटरचेंजेस, ६ बोगदे आहेत.
१८९ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ११० भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी २०९ भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी ३ भुयारी मार्ग आणि ३ उन्नत मार्गाचा समावेश असेल.