Shreya Maskar
समोसा बनवण्यासाठी मैदा, रवा आणि बटाटे इत्यादी साहित्य लागते.
आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, धणे, बडीशेप, जिरे, काळी मिरी, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर, कसुरी मेथी, तेल आणि मीठ इत्यादी मसाले लागतात.
समोसे बनवण्यासाठी मोठ्या ताटात तेल, मीठ आणि मैदा टाकून कणिक मळून घ्या.
बटाट्याचे सारण बनवण्यासाठी उकडलेले बटाटे बाऊलमध्ये मॅश करून घ्या.
तूप गरम करून त्यात धणे, बडीशेप, जिरे आणि मीठ घालून मंद आचेवर परतून घ्या.
या मिश्रणात आले, हिरव्या मिरच्या, मॅश बटाटे, काळी मिरी, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर, कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून मिक्स करा.
मैद्याच्या पिठाची बारीक पारी करून त्यात सारण भरून त्याला समोसाचा आकार द्या.
तयार समोसा खरपूस तेलात तळून घ्या.