Ruchika Jadhav
समोसा आणि चहा हे कॉम्बीनेशन अनेकांच फेवरेट आहे. चहाच्या चुसकीसह समोसा खाणं सर्वांनाच आवडतं.
समोसा बनवण्यासाठी आधी बटाट्याची भाजी बनवून घ्या.
तुम्ही येथे तुम्हाला हवी ती भाजी, पनीर, किंवा अगदी नूडल्सचं फिलींग देखील समोसामध्ये भरू शकता.
समोसा बनवण्यासाठी मैदाचं पीठ मळून थेडावेळ मुरत ठेवा.
त्यानंतर गोल चपाती लाटून ती मधोमध कट करा. किंवा मग लांबट आकारात थोटी पोळी लाटून घ्या.
समोसामध्ये सर्व सारण भरल्यावर त्याच्या सर्व कडा बंद करून घ्या.
तयार समोसा तेलात गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून काढा.
तयार समोसा तुम्ही चहा किंवा हिरवी, लाल चटणी किंवा लोणच्यासह देखील खाऊ शकता.