Ruchika Jadhav
समंथाचं लग्न साल २०२१ मध्ये अभिनेता नागा चैतन्यसोबत झालं होतं. त्यानंतर २०२१ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.
समंथा आणि नागा हे टॉलिवूडचे क्यूट कपल होते. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला.
नुकतेच नागाने अभिनेत्री शोभितासह साखरपुडा उरकला आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर सर्वच चाहते आता समंथाची जास्त काळजी व्यक्त करत आहेत.
त्यात आता समंथा सुद्धा लग्न करणार अशी चर्चा जोरदार रंगत आहे.
खरंतर समंथाच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिला लग्नाची मागणी घातली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाला असून समंथा या चाहत्याला काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.