Manasvi Choudhary
स्वयंपाक करताना पदार्थाची चव वाढवण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. जेवण बनवताना मीठ पटकन हातात यावे म्हणून गॅस-शेगडीच्या अगदी जवळ ठेवले जाते.
पण तुम्हाला माहीत आहे का? स्वयंपाक घरात मीठ ठेवण्याची ही जागा चुकीची आहे. वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात मीठ कुठे आणि कसे ठेवावे हे जाणून घ्या.
गॅस शेगडीजवळ सतत गॅस पेटत असल्यामुळे तिथे प्रचंड उष्णता असते. मीठामध्ये ओलावा शोषून क्षमता अधिक असते, ज्यामुळे गॅसजवळ ठेवलेले मीठ सुकते किंवा गोठते.
किचनच्या सिंकजवळ पाण्याचा वापर होतो त्यामुळे तेथे ओलावा अधिक असतो. अशा ठिकाणी मीठ ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया किंवा जंतू जाऊ शकतात.
वास्तूनुसार मीठाचा संबंध चंद्र आणि राहूशी आहे. किचनमध्ये अयोग्य ठिकाणी मीठ उघडे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात