Shruti Vilas Kadam
काकडी, गाजर, मुळा, बीट आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांमध्ये फायबर असते. फायबरमुळे आतड्यांचे कार्य सुरळीत राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
बहुतेक भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. जेवणात सलाडचा समावेश केल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, लवकर भूक लागतं नाही त्यामुळे सतत खाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
गाजर, टोमॅटो, बीट आणि पालेभाज्या यांमध्ये विविध जीवनसत्त्वे असतात. यामुळे शरीराच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.
ताज्या भाज्या आणि काही फळांमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराच्या रोगप्रतिकारक वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
काकडी, टोमॅटो आणि बीट यांसारख्या पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत होते. मात्र, दिवसभर पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे.
भाज्यांमधील फायबर, पोटॅशियम हे आहारातील महत्त्वाचा भाग आहेत. भाज्या नियमित खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
गाजर, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये त्वचेला आवश्यक व्हिटामिन्स असतात. त्यामुळे सलाड खाल्ल्याने त्वचा आणखी ग्लोईंग होण्यास मदत होते.