Shruti Vilas Kadam
वेगाने चालण्याचा सराव करताना सुरुवातीला ५ मिनिटे हळू चालून शरीराला तयार करा. त्यानंतर १५ ते ३० मिनिटे वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. चालताना पाठ सरळ ठेवा, खांदे सैल सोडा आणि हात नैसर्गिकरीत्या हलवा. श्वास थोडा वाढला तरी बोलता येईल, असा वेग ठेवा.
वेगाने चालल्यामुळे शरीरातील एनर्जी जास्त खर्च होते. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत Brisk Walking केल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते.
Brisk Walking हा हृदयासाठी फायदेशीर एरोबिक व्यायाम आहे. नियमित वेगाने चालल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
नियमित चालण्यामुळे शरीराची इन्सुलिनला तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारू शकते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मधुमेह असल्यास व्यायामाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दररोज वेगाने चालल्याने शरीराची सहनशक्ती वाढण्यास मदत होते. नियमित सरावामुळे दैनंदिन कामे करताना लवकर थकवा जाणवण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
चालण्यामुळे मन प्रसन्न राहण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. मोकळ्या हवेत चालणे आणि नियमित शारीरिक हालचाल केल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होऊ शकतो.
वेगाने चालणे हा वजनाचा भार सहन करणारा व्यायाम आहे. त्यामुळे पायांचे स्नायू अधिक मजबूत होतात आणि हाडांचे आरोग्य टिकवण्यास मदत होते. पण, योग्य शूज वापरणे महत्त्वाचे आहे.