Shruti Vilas Kadam
पिझ्झा बेस, पिझ्झा सॉस, मोझरेला चीज, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, स्वीट कॉर्न आणि आवडीनुसार मसाले घ्या.
कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक किंवा पातळ कापून घ्या. भाज्या जास्त ओलसर नसतील याची काळजी घ्या.
पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉसचा थर व्यवस्थित पसरवा. त्यावर थोडे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाका.
सॉसवर चिरलेल्या भाज्या आणि स्वीट कॉर्न पसरवा. त्यावर भरपूर मोझरेला चीज घाला.
जाड तवा मंद आचेवर काही मिनिटे गरम करा. तव्यावर झाकण ठेवून गरम केल्यास उष्णता आत टिकून राहण्यास मदत होते.
पिझ्झा तव्यावर ठेवा आणि झाकण लावा. मंद आचेवर साधारण ८ ते १२ मिनिटे शिजवा. चीज पूर्णपणे वितळले आणि बेस खालून कुरकुरीत झाला की पिझ्झा तयार.
तयार पिझ्झावर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला. पिझ्झाचे तुकडे करून गरमागरम सर्व्ह करा.