Siddhi Hande
सत्यनारायण पूजेच्या दिवशी प्रसादासाठी शिरा बनवतात त्याची चव वेगळीच असते. असाच शिरा तुम्ही घरीदेखील बनवू शकतात.
साजूक तुपातला शिरा बनवण्यासाठी रवा, साखर, वेलची पावडर, केळी, जायफळ पावडर आणि तूप हे साहित्य आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्हाला एका कढईत तूप टाकायचे आहेत.त्यात बारीक रवा भाजून घ्यायचा आहे.
रवा मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. रवा गोल्डन ब्राउन होईपर्यंत सतत हलवत राहा. अन्यथा रवा जळून जाईल.
यानंतर या भाजलेल्या रव्यात केळीचे बारीक काप करुन टाका. केळी जास्त कच्ची नसायला पाहिजेत.
यानंतर एका टोपात बाजूला दूध गरम करायला ठेवा. दूधात थोडं पाणी टाकलं तरी चालेल.दूधाला छान उकळी येऊ द्या.
यानंतर हे उकळले दूध रव्यात टाका. आणि रवा सतत हलवत राहा.यानंतर ५ मिनिटांत रवा शिजून तयार होईल.
यानंतर तुम्ही शिऱ्यात ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकावी. यानंतर तुम्ही शिरा खाऊ शकतात.