Manasvi Choudhary
नागराज मंजुळे सैराट चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला.
हृदयस्पर्शी प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांची मने जिंकली.
आर्ची अन् परश्या अभिनीत सैराट चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील गाणी आजही चाहत्यांना भुरळ घालतात.
सैराट या चित्रपटामुळे आर्ची अन् परश्या हि जोडी रातोरात प्रसिद्ध झाली.
सैराटच्या यशानंतर आता सैराट २ कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
मात्र याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.