Shreya Maskar
मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या अभिनयासोबत हटके स्टाइलने चाहत्यांना वेड लावते. नुकतेच तिने एक भन्नाट फोटोशूट केले आहे.
सईने पांढऱ्या रंगाचा सुंदर रंगीबेरंगी नक्षीकाम असलेला घागरा चोळी परिधान केली आहे. एखाद्या अप्सराप्रमाणे सईचे या लूकमध्ये सौंदर्य खुललं आहे.
लूकला मॅचिंग ऑक्सिडाइज ज्वेलरी तिने परिधान केली आहे. तसेच ग्लॉसी मेकअपमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. कपाळावर बिंदी आणि मोकळे केस तिने सोडले आहे.
सईची कातिल नजर पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ती प्रत्येक फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. सईच्या या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
सईने "Festivities" असे या लेटेस्ट फोटोंना कॅप्शन दिले आहे. तिच्या फोटोंवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
"क्रेझी", "परम सुंदरी","माइंड ब्लोइंग", "खुप मस्त", "एखाद्या सुंदर पेंटिंग सारखा फोटो", "अप्रतिम फोटो" अशा कमेंट्स सई ताम्हणकरच्या फोटोंना मिळत आहे. तर एक युजर लिहितो की, "तुम हुस्न परी तुम जाने जहां तुम सबसे हसीं तुम सबसे जवान"
अलिकडेच सई ताम्हणकर 'गुलकंद' आणि 'ग्राउंड झिरो' या चित्रपटातून झळकली आहे. तसेच तिची 'डब्बा कार्टेल' वेब सीरिज देखील खूप गाजली. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.
सई ताम्हणकरचे इन्स्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अलिकडेच तिचा साबर बोंडं (Sabar Bonda) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.