ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बोल्ड, बिनधास्त अन् ब्युटिफुल अशी अभिनेत्री सई ताम्हणकरची ओळख आहे.
सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चाहत्यांची मने जिंकत असते.
सई ताम्हणकरच्या मानेवर,खांद्यावर खास टॅटू आहे.
सईच्या खाद्यांवर रोमन लिपीत काही अंक लिहले आहेत. या दोन तारखा आहेत.
सईच्या खांद्यावरील या टॅटूचा तिच्या एक्स नवऱ्याशी खास कनेक्शन आहे. यातील एक तारीख त्यांच्या लग्नाची आहे.
सईने अमेय गोस्वामीशी लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही.
सईने मानेवर हिब्रु लिपीमध्ये एक्स नवरा अमेयचं नाव लिहलं आहे.
सईच्या हाताच्या अंगठ्यावर स्टारचा टॅटूदेखील आहे.
सईने डाव्या हाताच्या एका बोटावर HBPHG असा टॅटू काढला आहे.ही हीप हॉपमधील एक स्टेप आहे. जी अमेय आणि सईची आवडती स्टेप होती.