Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगेने नवरा झहीर खानसोबत गणेश चतुर्थीचा सण साजरा केला आहे.
सागरिका घाटगेने गणेश चतुर्थी निमित्त आपल्या लेकाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
सागरिका आणि झहीरच्या लेकाचे नाव फतेहसिंह खान असे आहे.
झहीर खान हा भारतीय माजी क्रिकेटपटू आहे.
सागरिका आणि झहीरने पहिल्यांदाच आपल्या बाळाचा चेहरा दाखवला आहे.
सागरिकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते आणि कलाकारमंडळींकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सागरिका-झहीर आणि त्यांच्या मुलाने मिळून गणरायाची मनोभावे पूजा केली.
तिघेही फोटोंमध्ये खूप आनंदी आणि उत्साही पाहायला मिळत आहे.