ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याचवेळा पुरी किंवा भजी तळून झाल्यानंतर खुप तेल उरते.
हे तेल पदार्थ तळून तळून काळे पडल्यामुळे पुन्हा जेवणातही वापरता येत नाही.
पण प्रत्येक गृहीणीला उरलेले "एवढे तेल फेकून कसे द्यायचे?" याची चिंता असते.
पण तुम्ही हा एक स्मार्ट किचन हॅक वापरून खराब झालेले तेल पुन्हा आधीसारखे करू शकता आणि वापरूही शकता.
यासाठी एका कढईत खराब झालेले तेल गरम करण्यासाठी ठेवा.
एका वाटीत कॉर्न फ्लोर आणि पाण्याची एक घट्ट आणि स्मूद पेस्ट तयार करा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात कॉर्न फ्लोरची पेस्ट घाला.
काहीवेळानंतर तेलातील कॉर्न फ्लोरची पेस्ट काढून टाका. कॉर्न फ्लोरची पेस्ट तेलातील घाण शोषून घेईल.
थोडे थंड झाल्यावर एका गाळणीवर कापसाचा बोळा पसरवा आणि तेल गाळून घ्या. आता हे तेल पुन्हा वापरण्यासाठी तयार आहे.
गरम तेलात कॉर्न फ्लोरची पेस्ट टाकल्यावर बुडबुडे येऊन तेल हातावर उडण्याची शक्यता आहे. दक्षता घ्या.