ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यातील दमटपणा तेलांमध्ये होणारी ऑक्सिडेशन आणि रॅन्सिडिटीची प्रक्रिया वेगवान करतो. ज्यामुळे तेल लवकर खराब होतं.
ओलावा आणि उष्णतेमुळे ऑक्सिडेशन प्रक्रिया जलद गतीने होते. तेलाला उग्र वास आणि चव येते.
रॅन्सिडिटी असलेले तेल जेवणात वापरल्यामुळे भूक कमी लागते शिवाय ते आरोग्यास हानीकारक ठरते.
ओलावा आणि हवा तेलात जाऊ नये यासाठी एका हवाबंद कंटेनरमध्ये ते साठवून ठेवा.
तेल सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास ऑक्सिडाईज होते म्हणून ते अंधाऱ्या व थंड जागी ठेवा.
जर तुम्ही एकाच मोठ्या बाटलीत तेल ठेवत असाल, तर रोजच्या वापरासाठी लहान बाटलीमध्ये तेल काढून ठेवा.
किचनमध्ये ओलावा राहू नये यासाठी योग्य व्हेंटिलेशनची सुविधा करा.
तेल लवकर खराब होऊ नये यासाठी तुम्ही त्यात ७-८ मेथीचे दाणे घालू शकता.