Shreya Maskar
सातारा जिल्ह्यातील कराडजवळ सदाशिवगड किल्ला वसलेला आहे. जो महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे.
सदाशिवगड किल्ला सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर असून, ट्रेकिंगसाठी सोपा आहे.
सदाशिवगड किल्ला १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला, जो कराड परिसरावर आणि सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता.
सदाशिवगड किल्ल्यावर महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. जेथे भाविक दर्शनासाठी येतात आणि श्रावणात येथे यात्रा भरते.
गडावर महादेवाच्या मंदिरासोबतच विहीर, हनुमानाचे मंदिर आणि तटबंदीचे अवशेषही आढळतात.
सदाशिवगड किल्ल्यावर तटबंदीचे आणि जुन्या प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. जिथे काही ठिकाणी उंच भिंतींचे थर आणि खचलेले प्रवेशद्वार, बुरुज, तसेच पाण्याच्या टाक्यांचे अवशेष आढळतात.
सदाशिवगड किल्ला हा अफझल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला. किल्ल्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.