Shreya Maskar
देवघळी बीच म्हणजे कशेळी बीच होय. देवघळी बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळचा एक शांत, निसर्गरम्य आणि सुंदर समुद्रकिनारा आहे.
देवघळी बीच डोंगराच्या कुशीत वसलेला असून स्वच्छ निळ्याशार पाण्यामुळे आणि सोनेरी वाळूमुळे लोकप्रिय आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
देवघळी बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. देवघळी बीच कोकणाची शान वाढवतो. मोठे डोंगर, निळा समुद्र आणि सोनेरी वाळू यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.
कनकादित्य मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावात आहे. येथे तुम्हाला मंगलमय वातावरण अनुभवता येते.
देवघळी बीच 'टेबल पॉइंट'साठी प्रसिद्ध आहे.जो एका टेकडीवर असलेला व्ह्यू पॉइंट आहे, जिथून समुद्र आणि किनाऱ्याचे विहंगम दृश्य दिसते आणि सूर्यास्तासाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे.
रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने देवघळी बीचवर जाऊ शकता.
रत्नागिरीला गेल्यावर तुम्ही गणपतीपुळे, थिबा पॅलेस, रत्नादुर्ग किल्ला, जयगड किल्ला, आरे-वारे बीच याला भेट देऊ शकता. ही रत्नागिरीतील सुंदर पिकनिक स्पॉट आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.