Shreya Maskar
पवनीचा किल्ला भंडारा जिल्ह्यातील पवनी गावात वैनगंगा नदीच्या काठावर वसलेला आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व आहे.
पवनीचा किल्ला पवनी शहराचे रक्षण करणारी एक ऐतिहासिक भुईकोट तटबंदी असून, तो पवन राजाने बांधला आणि विदर्भाची काशी म्हणून ओळखला जातो.
पवनीचा किल्ला गावाच्या तीन बाजूंनी टेकड्यांनी वेढलेला आहे आणि चौथ्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. ज्यामुळे त्याचे सौंदर्य वाढते.
पवनी किल्ल्याची तटबंदी आणि खंदक आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहेत, विशेषतः एक भक्कम भिंत आणि पायथ्याशी असलेला तलाव लक्ष वेधून घेतो.
पवनीचा किल्ला हा वाकाटक काळात एक समृद्ध व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित झाला होता.
पवनी येथील किल्ल्याच्या उत्खननातून बौद्ध स्तूपांचे अवशेष, सातवाहन काळातील विटांच्या भिंती आणि भांडी सापडले आहेत.
पवनीचा किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला पर्याय आहे, खासकरून हिवाळा आणि पावसाळ्यानंतर, जिथे निसर्गाची हिरवळ आणि ऐतिहासिक वास्तूंचा अनुभव मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.