Shreya Maskar
महाशिवरात्रीच्या उपवासाला आवर्जून नाश्त्यासाठी साबुदाणा पराठा बनवा.
साबुदाणा पराठा बनवण्यासाठी साबुदाणा, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची, बडीशेप, जिरे, काळी मिरी, पांढरे तीळ, उपवासाचे मीठ आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
साबुदाणा पराठा बनवण्यासाठी गरम तुपात साबुदाणा कोरडा तळून घ्या.
त्यानंतर साबुदाणा मिक्सरला वाटून त्याची जाडसर पावडर बनवा.
एक बाऊलमध्ये साबुदाणा पेस्ट टाकून त्यात उकडलेला बटाटा, जिरे, बडीशेप, हिरव्या मिरच्या, पांढरे तीळ, चिरलेली कोथिंबीर, उपवासाचे मीठ, काळी मिरी पावडर आणि तळलेला अख्खा साबुदाणा घालून पाण्याच्या मदतीने सर्व छान मिक्स करून घ्या.
तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याचे पराठा लाटून घ्या.
तुपात पराठे मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
तुम्ही दही सोबत साबुदाणा पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता.