Shreya Maskar
शाळेतून आल्यावर मुलांसाठी नाश्त्याला चटपटीत दहीवडा बनवा.
दहीवडा बनवण्यासाठी उडीद डाळ, दही, साखर, मीठ, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
दहीवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ गरम पाण्यात १ तास भिजत ठेवून मिक्सरला वाटून घ्या.
वाटलेल्या डाळीत मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
आता पिठाचे गोल वडे थापून तेलात खरपूस तळून घ्या.
तयार वडे थंड दहीमध्ये थोडा वेळ घोळवून ठेवा.
दहीवड्याची चव वाढवण्यासाठी त्यात तुम्ही थोडा सांबारही टाकू शकता.
शेवटी चाट मसाला, कोथिंबीर, शेव भुरभुरवा.