Diabetes Fasting Diet: डायबिटीजचे रूग्ण उपवासाला साबुदाणा खाऊ शकतात का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणून घ्या योग्य पदार्थ

Manasvi Choudhary

श्रावणी सोमवार

आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे. श्रावणात अनेजण भगवान शंकराच्या भक्तीसाठी उपवासाचे व्रत करतात.

Shravani Somvar 2026

साबुदाण्याचे पदार्थ

उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे किंवा थालिपीठ असे पदार्थ घरोघरी केले जातात. मात्र ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी उपवासाला साबुदाणा खावा की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Diabetes Fasting Diet

डायबिटीजचे रूग्ण साबुदाणा खाऊ शकतात का?

यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी उपवासाला साबुदाणा खावा की नाही? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Sabudana Khichdi | Yandex

डायबिटीजच्या रुग्णांनी साबुदाणा खावा का?

साबुदाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे असते. साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो यामुळे साबुदाणा खाल्ल्यानंतर पचनादरम्यान त्याचे रूपांतर साखरेत होते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Sabudana Khichdi | Yandex

योग्य प्रमाणात खा

जर डायबिटीजच्या रूग्णांना उपवासाला साबुदाणा खायचे असेल तर कमी प्रमाणात खाणे अत्यंत महत्वाचे आहे.

Can Diabetics Eat Sabudana?

डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपवासाचे पदार्थ

१) साबुदाण्याऐवजी वरीचे तांदूळ किंवा शिंगाड्याच्या पिठाच्या भाकरीचे सेवन तुम्ही करू शकता.

२) मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणून तुपामध्ये मखाने भाजून त्याचे सेवन करा.

Bhagar | Yandex

३) रताळ्यामध्ये फायबर आणि पौष्टिक घटक असतात. उकडलेले रताळे डायबिटीजचे रूग्ण खाऊ शकतात.

४) बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि सफरचंद, पेरू, संत्री यांसारखी कमी साखरेची फळे उपवासात खाऊ शकता.

Diabetes Fasting Diet | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Latest Mangalsutra Designs: फुलांच्या डिझाईनचे मंगळसूत्र; रोजच्या वापरासाठी पाहा 5 सुंदर डिझाईन्स

Latest Mangalsutra Designs
येथे क्लिक करा..