Shreya Maskar
आपल्याला अनेक वेळा ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते. तेव्हा जंक फूड खाण्यापेक्षा हेल्दी खाऊ खा. तुम्ही साबुदाणा चिवडा ट्राय करू शकता.
घरी बनवलेला साबुदाणा चिवडा तुम्ही ३-४ महिने खाऊ शकता. तसेच तो हवा बंद डब्यात स्टोर करा. जेणेकरून जास्त वेळ टिकेल. नरम होणार नाही.
कुरकुरीत साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी साबुदाणा, शेंगदाणे, खोबरे, तेल, जिरे पूड, तिखट, साखर, फरसाण इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुम्हाला आवडतील ते पदार्थ देखील टाकू शकता.
कुरकुरीत साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम कमी तेलात साबुदाणा तळून घ्या. साबुदाणा तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा.
दुसऱ्या पॅनमध्ये शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घ्या. तुम्ही यात चण्याची डाळ भाजून टाकू शकता.
तळलेल्या साबुदाणे एका बाऊलमध्ये काढून त्यात मीठ, साखर, जिरेपूड, लाल तिखट घालून चांगले मिक्स करा. मसाला सर्व साबुदाण्याला लागला पाहिजे.
त्यानंतर चिवड्यात तळलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप घाला. तुम्ही यात कुरकुरीत बटाट्याच्या स्ट्रिक्स देखील टाकू शकता. हा चिवडा उपवासाला देखील खाल्ला जातो.
साबुदाणा चिवड्याची चव वाढवण्यासाठी यात फरसाण, बटाटा शेव देखील टाका. तसेच तळलेला कढीपत्ता टाका. चांगली चव येईल.