Matar Puri Recipe : हिरव्यागार मटारची खुसखुशीत पुरी, एक घास खाताच नेहमीची पुरी विसरून जाल

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात हिरवे मटार पाहायला मिळतात. मटारपासून अनेक पदार्थ बनवता येतात. सकाळी डब्यासाठी झटपट मटार पुरी बनवा.

Matar Puri | yandex

मटार पुरी

हिरव्यागार मटार पुरी बनवण्यासाठी मटार, कोथिंबीर, पाणी, लसूण, आलं, जिरे, गव्हाचे पीठ, बेसन, ओवा, तीळ, हिंग, धणे पूड, लाल तिखट मसाला, मीठ, तेल इत्यादी साहित्य लागते.

Matar Puri | yandex

मटार

हिरव्यागार मटारची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम पाण्यात मटार दाणे वाफवून घ्या. मटार कच्चे राहणार नाही याची काळजी घ्या.

matar | yandex

हिरव्या मिरच्या

मिक्सरच्या भांड्यात उकडलेले मटार दाणे, कोथिंबीर, लसूण , हिरव्या मिरच्या, आलं, जिरे टाकून एक पेस्ट बनवा.

Green chilies | yandex

गव्हाचे पीठ

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये टाकून त्यात गव्हाचे पीठ, बेसन, ओवा, तीळ, हिंग, धणे पूड, लाल तिखट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, तेल घालून सर्व चांगले मिक्स करा.

Wheat flour | yandex

पाणी

मिश्रणात गरजेनुसार पाणी टाकून कणिक मळून घ्या. कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून पुरी लाटून घ्या.

water | yandex

पुरी तळा

गरम तेलामध्ये पुऱ्या गोल्डन फ्राय करा. गरमागरम पुऱ्या लोणचं, दही, सॉस, पुदिन्याती चटणीसोबत खा. हा पदार्थ प्रवासासाठी उत्तम आहे.

Matar Puri | yandex

फायदे

मटारमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे भरपूर असतात. ज्यामुळे पचन सुधारतात, वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखर संतुलित करतात, हृदयाचे आरोग्य सुधारते. हाडे मजबूत राहतात. त्वचा चमकदार होते.

Matar Puri | yandex

NEXT : मकर संक्रांत स्पेशल रसमलाई, घरीच १० मिनिटांत मिठाई तयार

Rasmalai Recipe | yandex
येथे क्लिक करा...