Shreya Maskar
इन्स्टंट रसमलाई बनवण्यासाठी साखर, वेलची पावडर, ब्रेड, फुल क्रीम मिल्क, केशर आणि ड्रायफ्रुट्स इत्यादी साहित्य लागते. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घ्या.
इन्स्टंट रसमलाई बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध उकळवा. गॅस कमी आचेवर ठेवा, जेणेकरून दूध ओतू जाणार नाही.
उकळलेल्या दुधात साखर, वेलची पावडर, केशर आणि कापलेले ड्रायफ्रुट्स टाकून मिक्स करा. सतत ढवळत रहा.
आता ब्रेडचे बाजूचे टोक काढा आणि ब्रेडला गोल आकारात कापा. छोट्या रसमलाई सारखा आकार करा.
आता ब्रेडचे तयार गोल एका बाऊलमध्ये काढा आणि त्यावर दुधाचे मिश्रण ओता. थोडा वेळ दुधात ब्रेड भिजवून ठेवा.
5-6 मिनिटांनी दुधातून ब्रेड बाहेर काढा आणि किंचित हाताना दाबून नंतर प्लेटमध्ये काढून ठेवा.
एका प्लेटमध्ये ब्रेड काढून त्यात रबडी टाका. ज्याने रसमलाई अधिक घट्ट होईल. अशाप्रकारे स्वादिष्ट रसमलाई तयार झाली.
रसमलाई केशर आणि रसमलाई टाकून फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून ती अधिक थंड होईल आणि खाताना खूपच टेस्टी लागेल. मकर संक्रांतीची शोभा वाढेल.