Shreya Maskar
मकर संक्रांत २ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मकर संक्रांतीला नैवेद्यात खास झटपट होणारी पुरणपोळी बनवा. सिंपल रेसिपी आताच नोट करा.
खव्याची इन्स्टंट पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुरण तयार करा. यासाठी एका पॅनमध्ये हरभरा डाळ, हळद आणि तेल घालून शिजवून घ्या.
शिजवलेली डाळ पुरण यंत्रात बारीक करून घ्या. यात आवडीनुसार गूळ टाका. त्यानंतर त्याची पेस्ट बनवा. पुरण जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या.
त्यानंतर मिश्रणात वेलची, जायफळ पावडर आणि केशर घालून मिक्स करा. तुम्ही यात ड्रायफ्रूट्सची पेस्ट देखील टाकू शकता.
आता खवा हाताने बारीक करून तुपात परतून घ्या. परतलेला खवा पुरणपोळीच्या मिश्रणात चांगला मिक्स करा. जेणेकरून पोळी अधिक मऊ होईल.
कणिक मळण्यासाठी परातीत मैदा, मीठ, तेल आणि पाणी टाकून मऊसर कणिक मळून घ्या. तयार कणिक 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
कणिकेचे छोटे गोळे करून त्याची पारी लाटा आणि त्यात सारण भरून गोड पुरणपोळी लाटा. पॅनमध्ये तूप टाकून त्यात पुरणपोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
गरमागरम पुरणपोळी दूध किंवा तुपासोबत खा. हा पदार्थ फक्त १५ मिनिटांत तयार होईल. तसेच घरातील सर्वांनाच खूप आवडेल.